loader
Breaking News
Breaking News
Foto

बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिरातर्फे तालुकास्तरीय ‘अभिवाचन स्पर्धा’

मालवण, (प्रतिनिधी) - बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर, धुरीवाडा, यांच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जिल्हा साहित्य संमेलन’ यांचे औचित्य साधून १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता साने गुरुजी वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला गट: सर्व वयोगटांतील स्पर्धकांसाठी बॅ. नाथ पै यांच्या जीवनावर आधारित पुस्तके, लेख किंवा भाषणांचा काही भाग, युवा गट: इयत्ता नववी ते पदवीधर महात्मा जोतीबा फुले यांनी लिहिलेल्या अथवा त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांमधील काही भाग. स्पर्धेसाठी वेळ ७ मिनिटे असेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २९ नोव्हेंबर रोजी ‘जिल्हा साहित्य संमेलना’मध्ये मान्यवरांच्या हस्ते पार पडेल. पारितोषिक वितरण समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित असणार्‍या स्पर्धकांनाच पारितोषिक प्रदान करण्यात येईल. सर्व बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्रे जिल्हा साहित्य संमेलनामध्येच दिली जातील. नावनोंदणीची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर असून नावनोंदणीसाठी ९४२०४२३७९०, ८०१०७७३४७९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg