loader
Breaking News
Breaking News
Foto

हवामान अनुकूल डिजिटल, हरित तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती घडेल, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - बदलत्या हवामानाने निर्माण केलेल्या आव्हानांवर हवामान अनुकूल डिजिटल आणि हरित तंत्रज्ञानाने कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रात क्रांती घडेल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी आज वेंगुर्ले येथे केले. इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल अग्रीकल्चरल रिसर्च (आयएससीएआर), कॅनिंग टाऊन, पश्चिम बंगाल; डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली; केंद्रीय मृदा लावनता अनुसंधान संस्थान, कर्नाल, दापोली चॅप्टर ऑफ आएससीएआर आणि इंटर डिसीप्लीनरी सोसायटी फॉर अडव्हानसमेंट ऑफ अग्रीकल्चरल सायंसेस अँड टेक्नॉलॉजी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात "किनारपट्टी आणि संलग्न कृषि परिसंस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी हवामान अनुकूल डिजिटल आणि हरित तंत्रज्ञान" या विषयावरील चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उ‌द्घाटनपर सत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धीमत्ताचे कार्यक्रम संचालक प्राध्यापक अजित जावकर, इस्कार (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कोस्टल अग्रीकल्चरल रिसर्च) चे सचिव आणि परिसंवाद आयोजन समितीचे सचिव डॉ. टी. डी. लामा, इस्कारचे अध्यक्ष डॉ. बी. माजी, कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, पंजाबच्या कपूरथला येथील राष्ट्रीय अक्षय्य ऊर्जा संस्थेचे महासंचालक डॉ. अतुल मोहोड, परिसंवादाचे स्थानिक सचिव डॉ. संतोष सावर्डेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg