loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना शहर शाखा दापोली आयोजित फॅन्सी डान्स स्पर्धैला उस्फुर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) - शिवसेना शहर शाखा दापोली आयोजित आणि दापोलीचे आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री नाम. योगेश कदम पुरस्कृत फॅन्सी डान्स स्पर्धेला स्पर्धकांचा आणि दापोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाम. योगेश कदम यांच्या माध्यमातून नवरात्रौत्सवात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील उपक्रमाचे आयोजन करुन शिवसेना शहर शाखा दापोलीच्या वतीने स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या विशेष नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दापोली आणि परिसरातील अनेक बालकलाकार व तरुण डान्सर्सनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे सादरीकरण केले. स्पर्धेला दापोलीकरांनी प्रचंड दाद दिली असून, प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच स्पर्धेत प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. सर्व विजेत्यांचा सन्मान दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ .कृपा घाग, शहर पालक राजेंद्र पेठकर, शिवसेना दापोली शहर महिला आघाडी प्रमुख सौ. रसिका पेठकर, शहर संघटक मंदार केळकर, शहर समन्वयक प्रकाश साळवी, युवा शहर अधिकारी स्वप्निल पारकर, युवती शहर अधिकारी कीर्ती परांजपे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg