संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - निरागस लहान मुलींमध्ये स्त्रीशक्तीची उपासना व्हावी, मुलींचे कन्या पूजन म्हणून केल्याने स्त्री शक्ती जागृत व्हावी, चालू असलेल्या भितीदायक परिस्थितीमध्ये स्वतःचे संरक्षण स्त्रीने केले पाहिजे.अशा वैचारिक हेतूने लहान मुली निरागस आणि उत्साही असतात. त्यामुळे त्यांच्यासोबतचे वातावरण आनंददायी असते. मानसशास्त्रीय विचार करता लहान मुलींचा सन्मान समाजात स्त्री विषयी आदर वाढवतो. आणि निरागसतेतून मानसिक आनंद मिळवतो. कन्यांचे पूजन म्हणजे स्त्री शक्ती, सन्मान, समता आणि करुणा या मूल्यांचे प्रतीक आहे. म्हणून नवरात्री सण कन्या पूजन शिवाय अपूर्ण मानला जातो. साधारणपणे या कन्या पूजेनास दोन ते दहा वर्षापर्यंत कन्यांचे पूजन करण्यात येते. हे कन्या पूजन नवरात्रीतील सामान्यपणे नवमीला केले जाते. नवरात्रीतील या कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे.
दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत कन्या पूजन केलेल्या दुर्गा देवींची विविध रूपे दिसतात. लहान मुलींमध्ये साक्षात माता दुर्गा किंवा शक्तींचा वास असतो. म्हणून त्यांविषयी आदर व्यक्त केला जातो. त्यानिमित्ताने समाजात मुलींचा परिणामी स्त्रीशक्तीचा आदर व सन्मान झाला पाहिजे, हा महत्त्वाचा संदेश यानिमित्ताने समाजात दिला जातो. अशा प्रकारचे मार्गदर्शन सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट अंतर्गत फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प समिती संगमेश्वरच्या वतीने आयोजित केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील केंद्रशाळा तुरळ नंबर २ येथे प्रकल्प समिती सदस्या तथा आंबव पोंक्षे येथील हरहुन्नरी व उच्चशिक्षित मार्गदर्शक महिला तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या रसिका पोंक्षे यांनी "नवरात्रीतील कन्या पूजन" या विषयावर विस्तृत व सखोल मार्गदर्शन केले.त्या वेळी पोंक्षे बोलत होत्या.
याप्रसंगी कन्या पूजन कार्यक्रमाला उपस्थित असणारे फिरती विज्ञान प्रयोगशाळा शिक्षक दिलीप काजवे, तुरळ केंद्र प्रमुख शांताराम नांदवडेकर, मुख्याध्यापक जयंत शिंदे यांनी याविषयी मनोगतिय मार्गदर्शन व्यक्त करताना वाढते शहरीकरण, होणारा डिजिटल बदल, वाढते तंत्रज्ञान, यामध्ये विशेषता मुली किंवा स्त्रियांची होणारी फसवणूक, त्यासाठी निरागस बालपणापासून मुलींच्या म्हणजेच प्रत्येक कन्येच्या अंगी धाडस, धीटपणा, निर्णय क्षमता, तसेच निर्भीडपणा जागृत होऊन भविष्यात व आयुष्यात प्रत्येकीला संकटाला सामोरे जाताना या उपक्रमातून प्रेरणा व उत्तेजन नक्की फायदेशीर ठरेल अशाप्रकारे अनेक उदाहरणें, दाखले, अनुभव,प्रसंग कथन करून तसेच व्यावहारिक उदाहरणे देऊन उपस्थित असणाऱ्या व पूजन झालेल्या मुलीला सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुलींना रांगेत बसवून त्यांचे पूजन व झेंडू फूल देऊन औक्षण करून प्रसाद देण्यात आला. त्यावेळी मुलींच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून आला. यावेळी वेगळ्या खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले. अशा प्रकारचा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीला प्रेरणा देण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन शिक्षक दीपक महाडिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतर शिक्षक कापडी व घडशी यांनी सहकार्य केले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.