loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक खेळीमेळीत संपन्न; नव्या कार्यकर्त्यांचा सत्कार

खेड - खेड तालुका काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यालय, खेड येथे तालुकाध्यक्ष अजिमभाई अ. रहिमान सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सुनिल सुधिर काते, वैशाली सुनिल काते, अथर्व सुनिल काते, राजेश नारायण कदम (लोटेमाळ), तजमुल सुर्वे (चाकाळे), अब्दुल कादीर हुसेन मुकादम, इब्राहीम पालेकर, शिव आदींचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ. शिंगे, जिल्हा उपाध्यक्ष महमूद पालेकर, जिल्हा सेक्रेटरी फैसल देसाई, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक मुराद लाडघरकर, उपाध्यक्ष तौफीक पोत्रिक, शहराध्यक्ष मंगेश भेरवकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा सचिव सिमा नितीन जाधव (शिंदे), खेड महिला शहराध्यक्ष नाझिमा तांबे, खाडीपट्टा महिला अध्यक्षा झिन्नत नाडकर, राबिया जसनाईक, सुवर्णा गमरे, नासर जसनाईक, महमंद काझी, नियाज तांबे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल शेवरकर यांनी केले, तर अध्यक्ष अजिम सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg