loader
Breaking News
Breaking News
Foto

जोपर्यंत गावात ग्रंथालय नाही, तोपर्यंत गावाचा विकास होत नाही - साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे

पनवेल (प्रतिनिधी) - तोपर्यंत गावचा विकास होत नाही, जोपर्यंत गावात ग्रंथालय उभे राहत नाही अशा परखड शब्दात ज्येष्ठ गजलकार, साहित्यिक व माजी सनदी अधिकारी डॉ. ऍड. दिलीप पांढरपट्टे यांनी काढले. येथील के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय इमारतीच्या भूमी-पूजन व पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले, पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे. संस्कृतीची निशाणी आहे. काही कारणामुळे वाचनालय उध्वस्त झाले, तर नागरिक जिवापाड मेहनत घेऊन वाचनालय पूर्वीसारखे उभे करतात. यासाठी त्यांनी श्रीलंकेमधील जाफना शहराचा दाखला दिला. बॉम्ब हल्ल्‌यामुळे उध्वस्त झालेल्या जाफना शहरात सर्वप्रथम ग्रंथालयाची टोलेजंग इमारत तत्परतेने उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, सर्व भाषा आपल्या भगिनी आहेत. उर्दू भाषा देखील आपली आहे. कारण हिंदीमध्ये अरबी व फारशी शब्दांच्या मिलाफाने ती तयार झाली आहे. शेवटी त्यांनी ग्रंथालयाच्या या प्रकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी कमळपतपेढीच्या अध्यक्षा मालती आंग्रे,को.म.सा.प. पनवेल व नवीन पनवेलचे अध्यक्ष गणेश कोळी व सुभाष कुडके, जनजागृती ग्राहक मंच पनवेलचे अध्यक्ष सुभाष फडके, संस्थापक के. एस. पाटील यांच्यासोबत अनेक संस्थांचे प्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg