चिपळूण (ओंकार रेळेकर) - चिपळूण तालुक्यातील शिरवली-वेलोंडेवाडी धरणाच्या उभारणीसाठी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला. नारदखेरकी, ओमळी आणि खरवते या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने या धरणाचा प्रस्ताव मांडून ग्रामस्थांची संमती मिळविण्यासाठी प्रयत्न केले. यामुळेच ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे आपल्याला समाधान असल्याचे सांगून धरणाच्या कामापासून पुनर्वसनापर्यंतच्या प्रक्रियेत ग्रामस्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र आणून पारदर्शकपणे चर्चा केली, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी वेलोंडे धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात बोलताना केले. शिरवली-वेलोंडेवाडी धरणाच्या जलपूजनाच्या निमित्ताने ते बोलत होते. धरणासंदर्भात अनेक दिवसांपासून विविध चर्चा आणि शंका उपस्थित केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी संबंधित ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.पत्र दिले म्हणजे काम झाले, असे समजू नका वर्तमानपत्रांमध्ये नेत्यांना निवेदने दिल्यानंतर कामे मार्गी लागल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. मात्र, अशा कामांचा सहा महिन्यांनंतर आढावा घेऊन प्रत्यक्षात किती कामे सुरू झाली, किती पूर्ण झाली आणि किती कामांना निधी मिळाला, याची माहिती नागरिकांनी घ्यावी. केवळ पत्र दिल्यामुळे काम पूर्ण झाले, असे समजणे योग्य नाही. कामाचा सातत्याने पाठपुरावा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे आमदार जाधव यांनी स्पष्ट केले. धरणासाठी ग्रामस्थांचा सुरुवातीपासून आग्रह शिरवली-वेलोंडेवाडी धरणाच्या उभारणीसाठी वेलोंडेवाडीतील ग्रामस्थांनी सुरुवातीपासून आग्रह धरला होता. पाध्ये काका, तांबे आणि रामपूरचे जोशी यांच्यासह अनेकांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामस्थांची संमती मिळविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी, जलसंपदा, पाटबंधारे, महसूल, फलोत्पादन आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून प्रत्यक्ष जागेवर बैठक घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली.
स्वेच्छा पुनर्वसन आणि शासकीय पुनर्वसन यांचे फायदे-तोटे ग्रामस्थांना समजावून सांगितले. तसेच बाधितांच्या जमिनीवरील झाडांची नोंद करून त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठीही प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. जलसंधारणातून पाणीटंचाईवर मात आपल्या कारकिर्दीत विविध धरणांमधील गळती काढून पाणी साठविण्यासाठी आणि गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले. असुर्डे धरणातील गळती दूर करून सात गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. अडरे धरणातील गळती दूर करून टेरव आणि कोंडमळा यांसह परिसरातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. धरणांतील पाण्याचा योग्य वापर आणि पाणीसाठ्याचे नियोजन यामुळे अनेक गावांच्या पाणीटंचाईवर मात करता आल्याचे त्यांनी सांगितले.१९९५ मध्ये चिपळूण तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी १८ टँकर लागत होते. पुढील काळात ही संख्या सातवर आणण्यात यश आले, असा उल्लेख करत त्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. आपल्या मतदारसंघातील गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यांच्या संबंधित भागांमध्ये पाणीटंचाई दूर करण्यासाठी नियोजनबद्ध काम केल्याचेही त्यांनी नमूद केले. धरणांच्या कामांबाबत वस्तुस्थिती तपासण्याचे आवाहन कळवंडे धरणाच्या कामासंदर्भातही त्यांनी भाष्य केले. धरणांची कामे, त्यांचा दर्जा आणि त्यातून नागरिकांना होणारा फायदा यांची वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. धरणांच्या उभारणीपासून पाण्याचे योग्य नियोजन, गळती रोखणे आणि गावांपर्यंत पाणी पोहोचविणे या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.
शिरवली-वेलोंडेवाडी धरणाच्या निमित्ताने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेताना, विकासकामांबाबत केवळ दावे न करता प्रत्यक्ष कामांची माहिती तपासावी, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले. चिपळूण तालुक्यातील शिरवली वेलोंडेवाडी धरणाचे जलपूजन शुक्रवारी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले यानंतर शिरवली गावच्या मंदिरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत आ.जाधव आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या समवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी धरणाविषयी आणि ग्रामस्थांच्या समस्यांविषयी परिपूर्ण मार्गदर्शन केले. आमदार भास्कर जाधव यांनी देखील सर्व कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी आ.भास्कर जाधव, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष जाधव, चिपळूण प.स सदस्या संजीवनी खापरे, माजी सरपंच संदीप तटकरे उप अभियंता विपुल खोत, बाळासाहेब काळदाते, मनीष भास्कर, उपतालुकाप्रमुख संदीप चव्हाण, प्रभाकर जाधव, रघुनाथ चाळके, सरपंच रिया गीमवकर, नम्रता मोहिते, चंद्रकांत ताणकर, संतोष गोंधळेकर, रमेश कुंभार, प्रकाश तटकरे, राजेंद्र लाड, दीपक धावडे, रवींद्र कदम, रमेश वेलोंडे, रवींद्र गमरे, सुरेश तांडकर, वैभव तांडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्णची प्रस्तावना प्रदीप आग्रे यांनी मांडली.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.