loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे नं. १ शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उत्साहात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळणे नं. १ व अंगणवाडी डबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी स्वनिर्मित आकाशकंदील, पणत्या व ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलागुण, उद्योजकता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदील, पणत्या तसेच टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या विविध उपयुक्त वस्तू प्रदर्शनात मांडल्या. या वस्तूंच्या विक्रीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि गावचे सरपंच अजित देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे कौतुक करून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. पालक व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg