loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळंदे येथील कबड्डी स्पर्धेत सालदुरेचा 'श्री सिमामाता' संघ विजेता

दापोली (प्रतिनिधी) : पाळंदे येथे कार्तिकी एकादशी निमित्त पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत सालदुरे येथील श्री सिमामाता कबड्डी संघाने अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत केळशीच्या गजानन संघर्ष कबड्डी संघाला द्वितीय क्रमांकावरच समाधान मानावे लागले. दापोली तालुक्यातील पाळंदे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षी कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. या कार्तिकि उत्सवानिमित्त अगदी दरवर्षीच धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रिडा विषयक आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्रिडाविषयक प्रकारातील कबड्डी स्पर्धेचे आयोजनामध्ये तालुक्यातील १६ कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. अशा या कबड्डी स्पर्धेत सालदुरे येथील श्री सिमामाता कबड्डी संघाने अंतिम विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत केळशी येथील गजानन संघर्ष कबड्डी संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले . या स्पर्धेत आंजर्ले ताडाचा कोंड येथील जय हनुमान कबड्डी संघाला तृतिय आणि टाळसुरे अमरभारत कबड्डी संघाला चतृर्थ क्रमांकाने गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेत श्री. सिमामाता कबड्डी संघ सालदुरेच्या रोहन ऊकेला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान देण्यात आला तर गजानन संघर्ष कबड्डी संघ केळशीच्या आविष्कार साळवी ला सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून उत्कृष्ट पकडीचे श्री सिमामाता सालदुरेचा श्री. संकुळकर या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या सालदुरेच्या श्री. सिमामाता कबड्डी संघाला सचिन तवसाळकर यांच्या हस्ते मानाचा चषक आणि रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे समीर शेवडे यांच्या देखरेखीखाली वृषाल सुर्वे, तुषार पाटील, संदेश झगडे, दिपक बोरकर, सुधीर कदम यांनी पंचाची चोख भुमिका पार पाडली. तर आपल्या ओघवत्या शैलितील भाषेत निलेश खेडेकर आणि उत्कर्ष कर्देकर यांनी स्पर्धेचे समालोचन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg