loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीमान आर. जी. काते विद्यामंदिर धामणी पंचक्रोशी माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या संकल्पनेला यश; पाच बंधाऱ्यांचा संकल्प… सहा बंधाऱ्यांतून साकार!

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस निर्माण होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन श्रीमान आर. जी. काते विद्यामंदिर धामणी पंचक्रोशी माजी विद्यार्थी सेवा संस्थेने जलसंधारणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण संकल्प केला होता. पंचक्रोशीतील पाण्याची समस्या कमी करण्यासाठी आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी संस्थेच्या वतीने पाच वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला होता.या संकल्पनेला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे पदाधिकारी,सभासद, हितचिंतक आणि दानशूर व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्वांच्या सहकार्याने आणि सामूहिक प्रयत्नांतून संस्थेच्या मूळ उद्दिष्टापेक्षाही एक पाऊल पुढे जात पंचक्रोशीत तब्बल ६ वनराई बंधारे खालीलप्रमाणे बांधण्यात यश आले आहे. १) पोयनार - नळपाणी योजना विहिरीजवळ २ बंधारे २) घेरापालगड कदमवाडी ३) घेरापालगड चव्हाणवाडी ४) धामणी काजारकोंड ५)आयनी हे यश केवळ सहा बंधाऱ्यांचे नाही, तर आपल्या सर्वांच्या एकजुटीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि गावाच्या विकासासाठी असलेल्या तळमळीचे प्रतीक आहे.विशेष म्हणजे, विद्यार्थी दशेत एकत्र आलेली माणसे शिक्षणानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असली, तरी आपल्या गावासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांनी आजही जिवंत ठेवली आहे. याच भावनेतून हा उपक्रम यशस्वी झाला.

टाईम्स स्पेशल

आज बांधलेले हे वनराई बंधारे उद्याच्या जलसमृद्धीचा पाया ठरतील. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत होईल. भूजलपातळी सुधारण्यास हातभार लागेल आणि परिसरातील शेती व पर्यावरणाला त्याचा लाभ होईल. या संपूर्ण उपक्रमात प्रत्यक्ष श्रमदान करणारे हात, आर्थिक मदत करणारे दानशूर व्यक्ती, मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ, सहकार्य करणारे ग्रामस्थ आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य या सर्वांचे योगदान मोलाचे आहे. आजच्या या यशातून एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झाली आहे की, समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे एखादी संकल्पना मांडली, तर समाज नक्कीच तिच्या पाठीशी उभा राहतो. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही केवळ माजी विद्यार्थी म्हणून एकत्र आलो नाही, तर आपल्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलो आहोत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg