loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शताब्दी वर्षानिमित्त खेडमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

खेड (प्रतिनिधी) : हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेवक मीनार उल्हास चिखले यांच्यावतीने खेडमधील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या वस्तूंचे अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास भाई कदम, माजी आमदार संजयराव कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, महिला शहर संघटक नेहा ताई दळी, नगराध्यक्षा मानवीताई बुटाला, गटनेते निकेतन पाटणे तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg