वैभववाडी, (प्रतिनिधी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत वैभववाडी तालुका शिवसेना संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये तालुक्यातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या सूचना आणि आगामी काळात पक्षवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी वैभववाडी तालुका शिवसेना कार्यकारिणीच्या वतीने नवनियुक्त लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या बैठकीला वैभववाडी तालुकाप्रमुख नंदकुमार शिंदे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मणराव राणे, उपजिल्हा संयोजक वसंत खानविलकर, तालुका सचिव गुलजार काजी, महिला आघाडी प्रमुख दिव्या पाचपुडे, शहरप्रमुख मनोज सावंत, तालुका महिला संघटक अर्चना कोरगावकर, महिला शहरप्रमुख मानसी सावंत, विभाग संघटक पंढरीनाथ सुर्वे, उपतालुकाप्रमुख सुरेश पांचाळ, विभागप्रमुख सूर्यकांत परब यांच्यासह तालुका कार्यकारिणीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान तालुका सचिव गुलजार काझी यांनी वैभववाडी तालुक्यातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, संघटनात्मक कामकाज आणि पक्षाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांना दिली. तालुकाप्रमुख नंदकुमार शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची बोरकर यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपापल्या विभागातील संघटनात्मक परिस्थिती, अडचणी, सूचना आणि पक्षवाढीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना मांडण्याची संधी दिली. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व सूचना मांडल्या. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत तालुक्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे, गावपातळीवरील संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि पक्षाच्या विचारांचा जनतेपर्यंत प्रभावीपणे प्रसार करणे या विषयांवर चर्चा झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांनी वैभववाडी तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावांत रुजविण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाची संघटना केवळ पदांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक गावातील नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी जोडली गेली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
संघटनावाढीसाठी शाखांची बांधणी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि पक्षाच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळातील संघटनात्मक नियोजनाबाबत माहिती देताना प्रदीप बोरकर यांनी लवकरच तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन पक्षवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच तालुका संघटनेच्या बळकटीकरणासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचेही त्यांनी सूचित केले. या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाजाची दिशा, जबाबदाऱ्या आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यापुढे दर महिन्याला संघटनेची नियमित बैठक घेऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याला पक्षवाढीसाठी स्पष्ट कार्यक्रम व जबाबदाऱ्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संघटनेच्या कामकाजात सातत्य, नियोजन आणि उत्तरदायित्व राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणाच्या शेवटी बोरकर यांनी पक्षशिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्षाच्या शिस्तीचे पालन करून परस्पर समन्वयाने काम करावे आणि संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.