loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशीत लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोळीगीतांची सुरेल मैफल; वनमंत्री गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती

नवी मुंबई (वाशी), : लोककलेचा अनमोल ठेवा जपणारे ज्येष्ठ लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘कोळीगीतांच्या कोळीवाऱ्यात, ये दादा आवर ये’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री श्री. गणेशजी नाईक यांनी विशेष उपस्थिती लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमादरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. लोककला आणि संस्कृती जपण्यासाठी उमप यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.कोळी संस्कृती, पारंपरिक लोकगीते आणि नृत्याच्या सुरेल संगमातून हा कार्यक्रम साकारण्यात आला होता. नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. या संगीतमय सोहळ्याला नवी मुंबईतील कलाप्रेमी रसिकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg