loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळीच्या सणात शेतकरी मात्र शेतमळ्यात, मळणीसह आडी उभारण्याच्या कामात व्यस्त

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणातील शेती संस्कृतीचं एक वेगळंच रूप सध्या ग्रामीण भागातील शिवारांमध्ये पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात चिखलात राबून, ऊन-पावसाची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी फुलवलेली भातशेती आता कापणीनंतरच्या कामांनी गजबजली आहे. शेतात कापून ठेवलेले भाताचे पेंढे एकत्र करणे, त्यांची मळणी करणे आणि वर्षभरासाठी धान्याची साठवणूक करण्याची लगबग सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पहाटेपासूनच शेतकरी कुटुंबे कामाला लागलेली दिसत आहेत. दिवसभर शेतात राबल्यानंतर मावळत्या सूर्याच्या साक्षीनेही कामाचा उत्साह कायम आहे. शेतातील पेंढ्यांचे भारे, धान्य गोळा करण्यासाठी केलेली तयारी आणि एकमेकांच्या मदतीने सुरू असलेली कामे ग्रामीण जीवनातील एकजुटीचे दर्शन घडवत आहेत. कोकणातील शेतकऱ्यांसाठी भातशेती म्हणजे केवळ पीक घेण्याचा हंगाम नाही, तर वर्षभराच्या अन्नधान्याची तरतूद आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत घेतलेली मेहनत आता प्रत्यक्ष धान्याच्या रूपाने घरात येत असल्याने शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

टाईम्स स्पेशल

आजच्या आधुनिक युगात अनेक बदल झाले, शेतीच्या पद्धती बदलल्या; मात्र कोकणातील शेतकऱ्यांची मातीशी असलेली नाळ आजही तितकीच घट्ट आहे. पिढ्यानपिढ्या जपली गेलेली शेतीची परंपरा, कुटुंबाची एकजूट आणि कष्ट करण्याची तयारी आजही ग्रामीण भागात अनुभवायला मिळते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg