loader
Breaking News
Breaking News
Foto

गोव्याच्या दिशेने येणार्‍या दुचाकीला शिवशाही बसची नागोठण्यात मागून धडक, मंडणगड येथील इसमाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर

संगलट (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने येणार्‍या दुचाकीला शिवशाही बसने धडक दिल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून दुसरा इसम गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर नागोठणे येथे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुचाकी एक्टिवा गाडीवरून येत असलेले विकास मोगरे व त्याचा चुलत भाऊ अभिषेक मोगरे हे मंडणगड येथे येत होते. बंधार्‍याचं काम करण्यासाठी हे मुंबईवरून निघाले होते. आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ते नागोठणे ब्रिज येथे आले असता सुसाट आलेल्या श्रीवर्धन एसटी डेपोच्या शिवशाही बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरची धडक एवढी जोरदार होती की या धडकेत दोघेही वेगवेगळ्या बाजूला पडले. विकास मोगरे यांच्या पोटावरून शिवशाही बसचे चाक गेले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर अभिषेक हा जखमी झाला आहे. सदरचा अपघात हा कामत हॉटेलपासून २०० मीटर अंतरावर झाला असल्याचे अंदाज आहे. विकास मोगरे हे एक्टिवा गाडीच्या मागे बसले होते. याबाबत नागोठणा पोलीस ठाणे अधिकारी येऊन पंचनामा करून एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg