loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले ग्रामस्थांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केसरी नदीचे पाणी अडवून श्रमदानाने बांधला बंधारा

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले ग्रामस्थांनी आपल्या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावापासून दुर असलेल्या बोरथळ वाघिवणे हद्दीतून वाहणाऱ्या केसरी नदीचे पाणी अडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. या महत कामासाठी आंजर्ले गावातील ६० ते ७० जणांचे हात राबले. यंदा कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे निर्माण झालेल्या संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने व ग्रामस्थांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेत मोठा सहभाग नोंदवला आहे. यात आंजर्ले गावही मागे राहीलेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता स्वतःच्या कष्टाने (श्रमदानाने) केसरी नदीच्या भल्यामोठ्या पात्रात दगड मातीचा बंधारा बांधून केसरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडवल्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची (बोअरवेल) भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या साठवलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच शेती व जनावरांसाठी होणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आंजर्ले गावाने दाखवलेली ही एकजूट आणि श्रमदानाचा हा उपक्रम इतर गावांसाठीही अत्यंत प्रेरणादायी असा उपक्रम ठरला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg