loader
Breaking News
Breaking News
Foto

कार्यालयाच्या आवारात माहिती अधिकारी यांचा फलक लावलेला नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला निषेध

दापोली (चंद्रशेखर जोशी) : महाराष्ट्र शासनाने २००८ मधील शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा दिवस ’राज्य माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयाना दिले आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयात जनमाहिती अधिकारी यांची नियुक्तीही करण्यात येत असून ते कार्यालयात माहिती अधिकार कायद्यानुसार मागण्यात आलेली माहिती नागरिकाना पुरवत असतात, जर माहिती अधिकारी यांनी ३० दिवसात मागितलेली माहिती दिली नाही तर प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे अपील करावे लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी कोण आहेत, याची माहिती कार्यालयामध्ये दर्शनी भागामध्ये फलकावर लिहिणे गरजेचे आहे. आज माहिती अधिकार दिन असल्याने सदर फलक लावलेला आहे कि नाही हे पाहण्यासाठी दापोली येथील पंचायत समिती कार्यालयाला माहिती अधिकार कार्यकर्ते सुशील बागकर यांनी भेट दिली असता त्यांना तेथे हा फलकच नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. यासंदर्भात सहाय्यक गटविकास अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता, आज सायंकाळपर्यंत हा फलक लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg