रत्नागिरी: पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, कौशल्याने हाताळलेली आंदोलने आणि गुन्हे तपासातील नैपुण्याची दखल घेत लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना राज्यपाल श्री विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मलबार हिल, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये 'उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करण्यात आले. कदम यांच्या या यशस्वी वाटचालीमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि त्यांनी दाखवलेला विश्वास अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
सुरेश कदम यांची १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी मुंबई, कोल्हापूर, गोंदिया, ठाणे, पालघर, पुणे व रत्नागिरीत सेवा बजावली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश भालेकर यांच्या शिफारशीवरून, फेब्रुवारी २००८ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक फत्तेसिंग पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी कदम यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची जयगड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नेमणूक केली. या काळात JSW प्रकल्प व आंग्रे पोर्टच्या उभारणीदरम्यान उद्भवलेली आंदोलने त्यांनी शांततेत हाताळली, तसेच JSW कॉलनीतील बॉम्बस्फोटाचा यशस्वी तपास केला.पुढे जैतापूर आंदोलनानंतर नाटे पोलीस ठाणे परिसरात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. दीपक पांडे यांनी कदम यांच्या जयगडमधील अनुभवाचा विचार करून त्यांच्यावर नाटेची जबाबदारी सोपवली; तिथेही त्यांनी पोलिसांबद्दलचा विश्वास परत मिळवून दिला.
रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक असताना २०१८ चे गँगवॉर व उद्योजक दीपक गद्रे खंडणी प्रकरणाचा तपास त्यांनी धैर्याने केला. गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या सेवेबद्दल त्यांना महासंचालक सन्मानचिन्ह व विशेष सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर लांजा येथे कार्यरत असताना केतकर ज्वेलर्स अपहरण प्रकरण व आंबा घाटातील दरोडा उघडकीस आणला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून पार पाडलेल्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊनच अखेर त्यांना हा राष्ट्रपती पदक बहुमान मिळाला.


















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.