loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडी किनारपट्टीवर मृत डॉल्फिन आढळला; शवविच्छेदनानंतर पालिकेकडून दफन

मालवण, (प्रतिनिधी) - मालवण दांडी किनारपट्टीवर सकाळी एक डॉल्फिन मृत अवस्थेत वाहून आल्याची घटना उघडकीस आली. यासंदर्भात माहिती मिळताच महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तत्परता दाखवत नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच आरोग्य अधिकारी संजय पवार आणि स्थानिक मच्छिमारांनी वन विभागाला या प्रकाराबाबत कळवले. त्यानंतर वन विभागाचे सत्यवान सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी त्याचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मृत डॉल्फिन उचलण्याच्या प्रक्रियेस काही काळ विलंब झाला. शवविच्छेदनाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नगरपालिका व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या जेसीबीच्या साहाय्याने दांडी किनारपट्टीवरच या डॉल्फिनला योग्य रीतीने दफन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg