loader
Breaking News
Breaking News
Foto

गौण खनिज नियमावलीत बदलासाठी भास्करराव जाधव यांचा जोरदार पाठपुरावा; कोकणातील महत्त्वाच्या मागण्यांना समितीची मान्यता!

चिपळूण (ओंकार रेळेकर) - महाराष्ट्र राज्याच्या गौण खनिज नियमावलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या तिसर्‍या बैठकीत कोकणातील गौण खनिज उत्खननासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आमदार भास्करराव जाधव यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. कोकणातील गौण खनिज उत्खननाच्या संदर्भातील प्रश्न, अडचणी आणि आवश्यक सुधारणांबाबत त्यांनी यापूर्वीच्या बैठकांमध्येही सातत्याने आवाज उठवला होता. आजच्या बैठकीतही त्यांनी आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करत त्या मान्य करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. अखेर समितीला त्यांच्या मागण्यांना मान्यता द्यावी लागली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आज या समितीची तिसरी बैठक पार पडली. राज्याच्या गौण खनिज नियमावलीत आवश्यक सुधारणा करून अधिक सुटसुटीत आणि परिणामकारक नियमावली तयार करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण हा भौगोलिक आणि नैसर्गिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे. त्यामुळे या भागातील गौण खनिज उत्खननाशी संबंधित प्रश्नांचा विचार करताना येथील स्थानिक परिस्थिती आणि अडचणी लक्षात घेऊन नियमावलीत योग्य बदल होणे आवश्यक आहे, ही भूमिका आमदार भास्करराव जाधव यांनी सातत्याने मांडली आहे. यापूर्वी झालेल्या समितीच्या बैठकांमध्ये त्यांनी कोकणातील गौण खनिज उत्खननासंदर्भातील विविध महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र केवळ मुद्दे मांडून न थांबता, आजच्या तिसर्‍या बैठकीतही त्यांनी आधीच्या बैठकांमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांचा पुन्हा ठामपणे पाठपुरावा केला. कोकणातील गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत स्थानिक परिस्थितीचा योग्य विचार करून नियमावलीत सुधारणा व्हाव्यात, यासाठी त्यांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समितीसमोर या विषयाचे गांभीर्य अधोरेखित झाले. अखेर त्यांच्या मागण्यांना समितीने मान्यता दिली.

टाईम्स स्पेशल

या बैठकीला आमदार भास्करराव जाधव हे चिपळूण येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसतानाही त्यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेत कोकणातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आपली भूमिका ठामपणे मांडली. गौण खनिज नियमावलीतील सुधारणा हा राज्याच्या महसूल आणि औद्योगिक व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. या प्रक्रियेत कोकणातील प्रश्नांना योग्य स्थान मिळावे आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जावेत, यासाठी आमदार भास्करराव जाधव यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कोकणातील जनतेच्या आणि स्थानिक भागातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठविण्याची आपली भूमिका त्यांनी या बैठकीतून पुन्हा अधोरेखित केली. आधीच्या बैठकांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला तिसर्‍या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने गौण खनिज नियमावलीतील प्रस्तावित सुधारणांच्या प्रक्रियेत कोकणाच्या प्रश्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg