loader
Breaking News
Breaking News
Foto

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिपळूण शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम; गोवळकोटमधील शेतकरी महिलांना बियाण्यांचे वाटप

चिपळूण (ओंकार रेळेकर) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिपळूण शिवसेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. गोवळकोट येथील शेतकरी महिलांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बियाण्यांचे वाटप करण्यात आले. शेतकरी महिलांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना शेतीकामात हातभार लागावा आणि कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न चिपळूण शिवसेनेने केला. या उपक्रमामुळे गोवळकोट परिसरातील महिला शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. पालकमंत्री ना.उदय सामंत, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक उदय जुवळे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg