केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली केंद्राची केंद्रस्तरीय मूल्यवर्धन विशेष शिक्षण परिषद बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा प्रभानवल्ली नं. ७ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून. या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, मूल्यशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा विकास आणि शालेय स्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व दीपप्रज्वलन सोहळ्यात पंचायत समिती सदस्य उमेश दादा पत्की, सामाजिक कार्यकर्ते अतिश मानगेकर, पालेकर तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख विक्रम शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपाध्यक्ष प्रभुलकर, प्रविणा गुरव, निशा गुरव, गौरी गुरव, पांचाळ उपस्थित होते.
शिक्षण परिषद म्हणजे केवळ प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्याचे व्यासपीठ नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे विचारमंथन करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. केंद्रातील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कोणते नावीन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील, अध्यापन अधिक परिणामकारक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार व जीवनमूल्ये कशी रुजविता येतील, यावर या परिषदेत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदर मूल्यवर्धन उपक्रम हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या माध्यमातून राबविण्यात येतो. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये, जीवनकौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. परिषदेमध्ये केंद्रप्रमुख विक्रम शिंदे यांनी कार्यशाळेची ओळख करून दिली. माधुरी सावंत यांनी मूल्यवर्धनातील मूल्ये, क्षमता व अध्ययन निष्पत्ती या विषयावर मार्गदर्शन केले, तर श्रीपत इंदुलकर यांनी मूल्यवर्धनाची सहा लक्ष केंद्रित उद्दिष्टे याविषयी माहिती दिली. लांजा तालुक्याच्या मूल्यवर्धन समन्वयक कोळवणकर यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी प्रात्यक्षिक सादर केले.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रभानवल्ली केंद्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल पंचायत समिती सदस्य उमेशदादा पत्की यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, परिश्रम, नियोजन आणि विद्यार्थ्यांची जिद्द महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे गौरवोद्गार काढले. या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. यामध्ये महेश शेडे, संतोष जाधव, संतोष पडवणकर, श्रीपत इंदुलकर, सुभाष बागडी, प्रदीप मडवी, दत्तात्रय जगताप, वैभव चौगुले, जुबेर, माधुरी सावंत, रुचिरा माने, जयश्री रक्ताडे आणि मयुरी शिवदास यांचा समावेश होता. परिषदेचे सूत्रसंचालन प्रदीप मडवी यांनी प्रभावीपणे केले, तर संतोष पडवणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.