loader
Breaking News
Breaking News
Foto

दादर - रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास नकार; कोकणवासीयांच्या मागणीला केराची टोपली

खेड,(प्रतिनिधी) - मुंबई आणि उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो कोकणी चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने फेटाळून लावली आहे. रेल्वेमार्गाची मर्यादित क्षमता, दादर स्थानकातील अपुर्‍या सुविधा आणि दिवा - दादर दरम्यान मार्ग उपलब्धतेतील अडचणी, अशी कारणे प्रशासनाने पुढे केली आहेत; मात्र, इतर मार्गांवर नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला जात असताना कोकणच्या हक्काच्या गाडीला नकार दिल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीमधून रेल्वे प्रशासनाची ही भूमिका समोर आली आहे. ही गाडी बंद झाल्यानंतर उत्तर भारतात जाणार्‍या गोरखपूर-दादरसारख्या नवीन गाड्यांच्या संचालनाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप कोकणी प्रवाशांकडून होत आहे. इतर मार्गांवर गाड्या सुरू होऊ शकतात मग कोकणासाठी क्षमतेचा आणि जागेचा प्रश्न कसा निर्माण होतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही केवळ रेल्वेगाडी नसून मुंबईकर कोकणी माणसाची गावाशी जोडणारी हक्काची जीवनवाहिनी होती, असेही निवेदनात म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि शेतीच्या कामांसाठी मुंबईतून कोकणात ये-जा करणार्‍या चाकरमान्यांना नियमित व सोयीस्कर रेल्वेसेवेअभावी दरवेळी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. यापूर्वी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि विविध संस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ नकारघंटाच मिळत असल्याने कोकणवासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने फेरविचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg