loader
Breaking News
Breaking News
Foto

‘जायचे तर सर्वांना आहे, मी उद्याही असेन नसेन...’, ४ दिवसांपूर्वीच नाना पाटेकर यांचे शेवटचे भाषण

पणजी - नाना पाटेकर यांनी गोवा टुरिझमच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची चर्चा आता सर्वत्र होत आहे. त्यामध्ये त्यांनी एक दिवस सर्वांना जायचेच आहे, मात्र जिवनात कसे जगलो, याचा माणसाने विचार केला पाहिजे. माणसाने फक्त स्वतःसाठी नव्हे तर आजूबाजूच्या परिसरासाठी आणि समाजासाठी काही केले पाहिजे. जीवनाचा अंत तर होणारच आहे. मात्र त्यापूर्वी असा विचार केला पाहिजे की, आपण कसे चांगले जीवन जगलो पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाना पाटेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उल्लेख करुन मनोहर पर्रीकर यांना आपला चांगला मित्र म्हटले. यावेळी ते म्हणाले ‘मनोहर पर्रीकर माझे मित्र होते, अशा मित्रावर गर्व असला पाहिजे. ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते, मात्र त्यांचे व्यक्तीत्व आणि मोठेपणा असा होता की, त्यांच्याकडे नेहमी सन्मानाने पाहिले जायचे. गोवा आणि देशाचे सौभाग्य आहे की, येथे असा माणूस जन्माला आला. ज्याने काही करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मनोहर पर्रीकर यांनी बरेच कार्य केले आणि ते जगातून निघून गेले. ते म्हणाले कोणालाही माहिती नाही की तो पुढच्या दिवशी असेल नसेल, जायचे तर सर्वांनाच आहे. उद्या मी असेन नसेन काही माहिती नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात ती वेळ येणार आहे. मी आज ७७ वर्षांचा झालो आहे. आणि ७८ वर्ष आता सुरु होईल. आपल्यापर्यंत सिमीत राहून जर जगायचे असेल तर तसे जगा आणि मरा.. असे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी गोवा टुरिझमच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.’

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg