loader
Breaking News
Breaking News
Foto

कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा आरव पाटील जिल्ह्यात प्रथम

मालवण (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील ३५ किलो वजनी गटात न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचा विद्यार्थी आरव दत्तात्रय पाटील याने दमदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे आरवची सातारा येथे होणार्‍या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आरवच्या या उल्लेखनीय यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कुस्ती स्पर्धेत आरवने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर तसेच न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg