loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीची सुकन्या विधी मिशाळ हिची राष्ट्रीय रोलबॉल संघात निवड!

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - रोलबॉलच्या खेळात सिंधुदुर्ग जिल्ह्याने नवा इतिहास रचला आहे. सावंतवाडी येथील मिलाग्रिस हायस्कूलची गुणवान खेळाडू विधी सुनील मिशाळ हिची २० व्या सब-ज्युनियर (अंडर-१४) महाराष्ट्राच्या रोलबॉल संघातील टॉप १२ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या रोलबॉल संघात स्थान मिळवणारी विधी ही पहिलीच मुलगी ठरली असून, तिच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शिरपेच मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​येथील लहानशा भागातून सुरू झालेला विधीचा जिद्दीचा प्रवास आज थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. तिची अफाट मेहनत, सातत्य आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. रोलबॉलच्या मैदानावर आपल्या चपळाईने आणि उत्कृष्ट खेळाने तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ​आगामी राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा २७ ते ३० डिसेंबर २०२६ दरम्यान मेघालय येथे होणार असून, या राष्ट्रीय स्पर्धेत विधी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

टाईम्स स्पेशल

विधिच्या या यशामध्ये तिचे मार्गदर्शक सागर सावंत, मिलाग्रिस हायस्कूलचे फादर रिचर्ड साल्ढाणा, क्रीडाशिक्षक हितेश मालंडकर आणि शेरॉन अल्फोन्सो यांचे मोलाचे व अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​राष्ट्रीय क्षितिजाकडे झेपावणाऱ्या विधी मिशाळ हिच्या पुढील यशस्वी वाटचालीस आणि मेघालय येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्गवासियांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! तिचा हा कर्तृत्वाचा प्रवास असाच नव्या यशशिखरांना गवसणी घालणारा ठरो, हीच सदिच्छा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg