loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संजयराव जाधव यांची नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यानी ही निवड जाहीर केली. या वेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले संजयराव जाधव सर्वसामान्यांचे खेड तालुक्यातील लोकनेते आहेत तालुक्यातील गोर गरीब जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे गोड व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एनवरे गावचे माजी सरपंच व १५ वर्ष उपसरपंच म्हणून कार्यरत होते. विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष म्हणुन काम करत असून खेड तालुका प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. १० वर्ष विविध कार्यकारी सोसायटी संचालक म्हणून काम पाहिले होते. तर २५ वर्ष संबंधित मराठा शिक्षण प्रसार संघ सचिव राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबाजीराव जाधव यांचे ते बंधू आहेत. त्यांच्या निवडीची घोषणा होताच जिल्ह्यात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात नव चैतन्य निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले असुन राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा संध्याताई राणे, राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, राज्य सचिव निवृत पोलीस अधिकारी आनंद जाधव, वैद्यकीय विभाग राज्य अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी, मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड, नवी मुंबई अध्यक्ष ॲड हरीश पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित कदम, रायगड जिल्हा अध्यक्ष विलासराव चाळके, महिला अध्यक्षा अस्मिता आत्माराम साळुंखे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष योगेश पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर शेळके, यांच्यासह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg