loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार सुनील तटकरेंच्या पुढाकाराने मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांसोबत कोकणच्या रेल्वे प्रश्नांवर CSMT येथे महत्त्वपूर्ण बैठक

खेड (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य इमारतीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक व वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांसमवेत खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव आणि कोकण विकास समितीच्या वतीने अक्षय मधुकर महापदी उपस्थित होते. बैठकीत कोकणातील, विशेषतः खेडसह चिपळूण, रत्नागिरी पट्ट्यातील प्रवाशांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीतील प्रमुख मागण्या : १. मुंबई-चिपळूण दररोज नवीन एक्सप्रेस सुरू करा - खेड रेल्वे स्थानकावर अनेक वर्षांपासून विविध महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी सातत्याने मागणी होऊनही रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सीएसएमटी किंवा एलटीटी येथून दररोज धावणारी मुंबई-चिपळूण नवीन एक्सप्रेस सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली. ही गाडी सुरू झाल्यास खेडसह संपूर्ण तालुक्यातील प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळेल आणि भविष्यात थांब्यांसाठी आग्रह धरावा लागणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. २. वंदे भारत १६ डब्यांची करा - वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता सध्या ८ डब्यांमध्ये धावणारी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची समस्या सुटेल.

टाईम्स स्पेशल

३. रत्नागिरी-दादर गाडी पुन्हा सुरू करा - कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची आणि महत्त्वाची असलेली रत्नागिरी-दादर रेल्वे सेवा पुन्हा नियमित सुरू करण्याची मागणी लावून धरण्यात आली. या सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे अधिकार्‍यांनी रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली येथे तातडीने पाठपुरावा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जल फाउंडेशनचे नितीन जाधव यांनी दिली. कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी जल फाउंडेशन आणि कोकण विकास समितीचा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील, असेही यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg