loader
Breaking News
Breaking News
Foto

'मिशन खाकी' अंतर्गत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना मैदाने उपलब्ध होणार गृह राज्यमंत्रीयोगेशदादा कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई (संतोष पिलके) : राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना आता राज्यातील मैदाने विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. तरुणांना मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी मिशन खाकी' अंतर्गत गृह( शहरे) राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी तरुणांच्या मेहनतीला योग्य पायाभूत सुविधांची जोड मिळावी आणि त्यांच्या पोलीस दलात सेवा करण्याच्या स्वप्नाला बळ मिळावे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कदम यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र लिहून यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली असून या निर्णयाने राज्यातील लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी 'मिशन खाकी' मोहीम सुरू केली आहे. याआनुषंगाने राज्यभरातील तरुणांशी संवाद साधला. अनेकदा मैदाने उपलब्ध होत नसल्याने तरुणांना भरतीची तयारी करण्यात मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागत होते. 'सरावासाठी मैदानांची उपलब्धता' ही त्यांची सर्वात मोठी गरज असल्याचे प्रकर्षाने समोर आले होते. युवकांच्या या अडचणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तात्काळ दखल घेत, हा लोकोपयोगी निर्णय मार्गी लावला असून पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्नांची बाळगलेल्या लाखो तरुणांचा आत्मविश्वास वाढणार असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी म्हटले आहे. नगर विकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने, क्रीडांगणे आणि त्यांच्या अंतर्गत व्यवस्थापन होत असलेकी मैदाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी संपेपर्यंत सरावास पहाटे 05:00 ते सकाळी 09:00 अथवा सायंकाळी 04:00 ते रात्री 08:00 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्वच्छ व सुरक्षित मैदान, क्रीडांगण, धावपट्टी तयार करून घेणे. तसेच सरावासाठी आलेल्या तरुणांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्राथमिक उपचाराची सोय करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे तसेच मान्यताप्राप्त क्रीडा संघटना यांचे सहकार्य घेण्यात यावेत, अशा सूचनाही जारी केलेल्या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. दरम्यान या निर्णयाने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी आनंद व्यक्त केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह(शहरे) राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg