देवरुख (वार्ताहर) - मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या जाहीर झालेल्या शेवटच्या वर्षाच्या निकालामध्ये राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या इंजिनिअरींग व एम एम एस विभागाने उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनियरिंग ह्या विद्याशाखेमधून ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ह्या शाखेचा निकाल ८९.२३ टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये सुबोध मुनीश्वर ९.१४ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम आला आहे. तर वृषाली परवते ८.९४ पॉइंट मिळवून दुसरी आणि वेदांत आकटे ८.८८ पॉइंटसह तिसरा आला आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुबोध मुनीश्वर आणि वृषाली परवते यांची क्यू स्पायडर ठाणे तर वेदांत आकटेची प्लेक्सीमस इंडिया रत्नागिरीमध्ये निवड झाली आहे.
तसेच मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा निकाल ७५ टक्के असून ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग ह्या शाखेचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेचा सुजल जाधव ७.५७ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, संघर्ष खडबले ७.३२ पॉइंट मिळवून दुसरा, तर चैतन्या सावंत ७.०१ पॉइंटसह तिसरी आली आहे. यामध्ये सुजल जाधव आणि संघर्ष खडबले यांची फुकोकु इंडिया प्रा. लि. पुणे कंपनीमध्ये निवड झाली आहे. तसेच ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग शाखेचा आदित्य पाटणकर ६.७८ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम आला असून त्याची लकी ऑटो व्हील्स रत्नागिरी या कंपनीमध्ये निवड झाली आहे. एम. एम. एस. या महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागाचा निकालही हाती आला असून तो ९१.११ टक्के इतका आहे. त्यामध्ये श्रिया साळवी ८.६९ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, साहिल नेवरेकर ८.६५ पॉइंटसह दुसरा, तर वेदांगी जंगम ८.४० पॉइंटसह तिसरी आली आहे. यामध्ये साहिल नेवरेकर याची प्लेक्सीमस इंडिया रत्नागिरी या कंपनीमध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयाचा एकत्रीत निकाल ८८.६२ टक्के इतका लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. रविंद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, संस्थेचे सीइओ प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या महाविद्यालयाने नॅकची सलग दोन वेळा मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या महाविद्यालयाला बी ++ ग्रेड प्राप्त झाली आहे. शिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सर्वेक्षण यादीमध्ये सलग नवव्यांदा स्थान प्राप्त केले आहे. या सर्वेक्षणानुसार हे महाविद्यालय महाराष्ट्रात ३३ व्या तर मुंबई विद्यापीठात नवव्या क्रमांकावर मानांकीत झाले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.