loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देव्हारे हायस्कूलचा दणदणीत विजय

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देव्हारे हायस्कूलच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदावर आपले नाव कोरले. उत्कृष्ट सांघिक समन्वय, आक्रमक खेळ आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दिमाखदार विजय मिळवला. या स्पर्धेचे उद्घाटन बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. रशिदे आणि शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनोगत व्यक्त करताना एपीआय आर. बी. रशिदे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. मैदानावर मिळणारा अनुभव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी सांगितले. अभिजीत देवळेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा क्षमतेचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते तालुका, जिल्हा तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. देव्हारे हायस्कूलच्या या यशाबद्दल प्राचार्य रामचंद्र कापसे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षक, पालक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे सातत्यपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आवश्यक संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार अमर राठोड याने केले. उपकर्णधार वैभव शिंदे यांच्यासह आदित्य बंगाल, आयुष मोरे, शुभम पवार, संदेश पवार, सुदर्शन चौधरी आणि ऋषभ मोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच विजय जाधव, प्रा. विष्णू बडे, कुंडलिक यादव, अमित रसाळ, प्रशांत उगले, चांदणी शिगवण, रोशनी साखरकर, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे, दत्तात्रय कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देव्हारे हायस्कूलच्या या दिमाखदार विजयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला नवे व्यासपीठ मिळाले असून, शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg