loader
Breaking News
Breaking News
Foto

कामथे येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळेच्या नूतन इमारतीचे आ. भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण (ओंकार रेळेकर) : गुहागर विधानसभा मतदारसंघातील कामथे (ता. चिपळूण) येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा क्रमांक १ च्या नूतन इमारतीचे उद्घाटन शिवसेना नेते तथा आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांना आधुनिक आणि पोषक शैक्षणिक वातावरणात शिक्षण घेता यावे, या उद्देशाने आमदार भास्करशेठ जाधव यांनी या शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निधीतून साकारलेल्या नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. शाळेच्या नवीन इमारतीमुळे परिसरातील शैक्षणिक सुविधांमध्ये भर पडली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही इमारत उपयुक्त ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे, माजी सभापती रिया कांबळे, सरपंच अक्षता कासार, माजी सरपंच हरीभाऊ कासार, मंगेश माटे, रविंद्र कदम यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg