loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री स्कूल भडगाव उसरेवाडी येथे हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन

संगलट (प्रतिनिधी) - खेड शहराजवळील पीएमश्री स्कूल भडगाव उसरेवाडी येथे मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी हिवाळी शिबिराचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पकता आणि आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने पाच दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा उसरे, शिक्षणतज्ज्ञ विजय दवंडे, स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू, माजी ग्रा.पं. सदस्य गंगाराम उसरे, मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर, उपशिक्षिका भागवत, उपशिक्षक महाले, घाणेकर, चिटणीस, जाधव, निकम, कुरमुरे, वनगुले, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले. कथाकथनातून विद्यार्थ्यांनी गोष्टी सांगण्याचे कौशल्य, भाषिक अभिव्यक्ती व आत्मविश्वास प्रदर्शित केला, तर चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आनंददायी व कृतीशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg