loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा - चंद्रकांत शिंगाडे

देवगड (प्रतिनिधी) - शासनामार्फत असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या नाट्यसंघाचा सत्कार कार्यक्रम शेठ म.ग. हायस्कूलमधील आयोजित कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक, शाळा समितीचे अध्यक्ष आणि शाळेच्या स्थानीय समितीचे सदस्य चंद्रकांत शिंगाडे यांनी असे मत व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या'श्वास'या विज्ञान नाट्याने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला असून विभागीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झालेली आहे. याबद्दल या नाटकामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थी कलाकारांचा, तसेच दिग्दर्शक आज्ञा अभिषेक कोयंडे आणि नेपथ्यकार अभिषेक नरहरी कोयंडे तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केलेला होता. यावेळी व्यासपीठावर शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती सदस्या अनुश्री पारकर, मुख्याध्यापक प्रविण खडपकर, विज्ञान विषय समिती प्रमुख रश्मी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी मनोगत व्यक्त करताना शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये असलेले अभिनय कौशल्य विकसित करावे. संस्थेतर्फे अशा उपक्रमांसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. विभागीय स्पर्धेसाठी त्यांनी सर्व संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या अनुश्री पारकर यांनी देखील सर्व संघाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन व आभार सहाय्यक शिक्षक सागर कर्णिक यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg