मंडणगड (प्रतिनिधी) - हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्मियांसह सर्व जाती-जमातीच्या लोकांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष संघटना तळागाळात मजबूत करा असे निर्देश शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी मंडणगड येथील मुंबई आणि ग्रामीण शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले. मंडणगड शहरातील तुषार ऊर्फ भाई साटम यांच्या कृपासिंधु निवासस्थानी मंडणगड तालुका शिवसेना मुंबई आणि ग्रामिण पदाधिकारी कार्यकारिणी तसेच शिवसैनिकांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तर रत्नागिरी शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी उपस्थित राहून मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिकांना पक्ष संघटने संदर्भात मार्गदर्शन केले. या सभेला मंडणगड तालुका शिवसेना उप तालुका प्रमुख संदीप वाघे, तालुका सह संपर्कप्रमुख रघुनाथ धनावडे, मंडणगड तालुका मुंबई संघटक विनायक चोरगे, उपसंघटक रवींद्र धनावडे, शिवसेना मंडणगड तालुका मुंबई सचिव दीपक बैकर, युवा सेना तालुका अधिकारी विश्वनाथ टक्के, मुंबई सहसचिव सुनील सोंडकर, माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर, वसंत अबगुल, कलंदर मुंगरुसकर, सुहेल मुकादम, राजू घाडगे, प्रमोद मोरे, उदय जाधव, दिनेश भागडे, वामन जाधव, विशाल कडव, आत्मारामकुमार म्हाब्दी, समीर हुसेन मुल्ला, दिनेश गुळेकर, मनोज म्हामुणकर, सिद्धार्थ शिंदे, संजीव राजवीलकर, सुनीलदत्त भोसले, दीपक सुतार आदी प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी गुहागर, चिपळूण, खेड, दापोली आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंडणगड तालुक्यातील सर्वसमावेशक संघटना बांधणी करिता शिवसेनेची ताकद प्रत्येक गावात आणि प्रभागात वाढवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना आणि विविध धर्माच्या लोकांना पक्षात मानाचे स्थान देऊन सक्रिय करावे, यासाठी विक्रांत जाधव हे तालूक्या तालुक्यात संपर्क दौरे करत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मंडणगड येथील बैठकीत त्यांनी तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने पक्षाशी जोडण्याचे आवाहन केले आहे.
शिवसेना पक्षाची सर्वधर्मसमभावाची आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवून तालूक्यात पक्षाचा भगवा अधिक मजबूतपणे फडकवण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना हा विचार आहे शिवसेना ही चळवळ आहे महाराष्ट्र पर्यायाने देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाच करेल, असा विक्रांत जाधव यांनी विश्वास व्यक्त करत या महत कार्याचा आपणही देश आणि राज्याच्या प्रगतीचा हिस्सा असलो पाहिजे, यासाठी शिवसेनेच्या मुळ प्रवाहात सर्वांना सामावून घेऊन आपला पक्ष सर्व मिळून एकजुटीने मजबूत आणि मोठा करुयात असे उपस्थितांना आवाहन केले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.