loader
Breaking News
Breaking News
Foto

भात उत्पादनात प्रतिगुंठा ३१ किलोची घट, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून आंबोलीत पीक कापणी प्रयोगाची पाहणी

बांदा (प्रतिनिधी) - आंबोली येथे यंदा भात पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. सरासरी प्रतिगुंठा ५० किलो भात उत्पादन अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १९ किलो उत्पादन मिळाले. वाढते तापमान, अल नीनोचा प्रभाव आणि भात पिकाच्या फुलोरा अवस्थेत पावसाचा पडलेला खंड यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. आंबोली येथील सर्वे क्रमांक १०३अ/७ब मधील पीक कापणी प्रयोग प्लॉटला काल पर्यवेक्षण अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आखणी केलेल्या प्लॉटमधील भात पिकाची प्रत्यक्ष कापणी करण्यात आली. कापणीनंतर जमा झालेल्या भाताचे वजन करून उत्पादनाचा अंदाज घेण्यात आला. या प्रयोगातून यंदाच्या हंगामातील उत्पादनातील घट अधोरेखित झाली. यावेळी मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी नंदकुमार ढेरे, पीक पाहणी सहाय्यक शशिकांत गावडे, काशिराम गावडे, विमा प्रतिनिधी आशिष आईर, सचिन कांबळे, सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक मुकूंद मराठे, शेतकरी सत्वशिला गावडे आणि कोतवाल लाडू गावडे उपस्थित होते. अल नीनोच्या प्रभावामुळे वाढलेल्या तापमानाचा भारतीय शेतीला फटका बसत आहे. यंदा भात पिकाच्या फुलोरा अवस्थेत पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला.

टाईम्स स्पेशल

परिणामी, भाताच्या उत्पादनात सरासरी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे चित्र आहे. प्रतिगुंठा अवघे १९ किलो उत्पादन मिळाल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण आणि नुकसानभरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद अचूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी, तर सहाय्यकांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे निर्धारित वेळेत करावेत, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg