loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत वन्य प्राण्यांच्या उपद्रवाला आळा बसणार; शिरोडा नाका ते नरेंद्र डोंगर परिसर जोडणाऱ्या कुंपणाचे काम पूर्ण

​सावंतवाडी, (प्रतिनिधी): सावंतवाडी शहरामध्ये गेल्या काही काळापासून गवा रेड्यांसह विविध वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या समस्येवर शाश्वत उपाय म्हणून शहरात तारेचे कुंपण (फेन्सिंग) करण्यात यावे, अशी सक्त मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, शिरोडा नाका ते नरेंद्र डोंगर भागातील महत्त्वाच्या टप्प्यातील तारेच्या कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील काही वॉर्डांमध्ये वन्य प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा हा प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून वनविभाग आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळून कुंपणाचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

टाईम्स स्पेशल

शहरातील नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन या महत्त्वाच्या कामाला गती दिल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी सावंतवाडी वनविभागाचे विशेष आभार मानले आहेत. या कुंपणामुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीमधील वावर रोखण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg