म्हसळा - तालुका ग्रामीण रुग्णालयात नुकतीच बंद असलेली डायलिसिस सेवा लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येणार असून याबाबत आरोग्य विभागाच्या स्तरावर सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत म्हसळा तालुक्यातील डायलिसिसच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्यात आली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वार्तालापादरम्यान दिली. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तीन डायलिसिस मशीनच्या माध्यमातून सहा रुग्णांना नियमित डायलिसिस उपचार दिले जात होते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या आर्थिक सहाय्यातून ही सेवा सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने अचानक डायलिसिस सेवा बंद पडली. त्यामुळे नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांसमोर मोठा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की म्हसळा येथील डायलिसिस सेवा बंद होण्याचा प्रश्न केवळ एका रुग्णालयापुरता मर्यादित नसून केंद्र शासनाच्या निधीतून पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या राज्यातील डायलिसिस केंद्रांनाही अशाच प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
श्रीवर्धन, रोहा आणि माणगाव येथील डायलिसिस केंद्रे जिल्हा नियोजन निधीतून राज्य शासनाच्या माध्यमातून कार्यान्वित असल्याने तेथील सेवा सुरू आहेत. म्हसळा येथील डायलिसिस सेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी आपण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. आरोग्य विभागाच्या स्तरावर यावर लवकरच योग्य तोडगा काढण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान सेवा पूर्ववत सुरू होईपर्यंत म्हसळा तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाशी संपर्क साधून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत तीन रुग्णांना श्रीवर्धन येथे डायलिसिस सेवा देण्यात आली असून उर्वरित तीन रुग्णांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. रुग्णसेवा बंद करण्यासाठी नव्हे तर ती अधिक सक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे स्पष्ट करताना म्हसळा येथील डायलिसिस सेवा कायमस्वरूपी पूर्ववत सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पीपीपी तत्त्वावर कार्यान्वित असलेल्या या सेवेच्या निधी व प्रशासकीय अडचणींमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली असून लवकरच त्यावर मार्ग काढला जाईल असेही त्यांनी नमूद केले.म्हसळा येथील डायलिसिस सेवा बंद झाल्यानंतर काही जणांकडून वस्तुस्थितीची पूर्ण माहिती न घेता टीका केली जात आहे.मात्र हा प्रश्न केवळ म्हसळा तालुक्यापुरता नसून संपूर्ण राज्यातील केंद्र शासनाच्या निधीवर चालणाऱ्या डायलिसिस केंद्रांशी संबंधित आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समजून घेऊन या प्रश्नाकडे पाहणे आवश्यक असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. एकंदरीत म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवा पुन्हा सुरू होण्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या आश्वासनामुळे तालुक्यातील डायलिसिस रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.