loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील बुजुर्ग, नामवंत विधीज्ञ अ‍ॅड. अजित कदम यांचे देहावसान

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रतिष्ठीत विधीज्ञ अ‍ॅड. अजित कदम यांचे बुध. दि. 7 ऑक्टो. 2026 रोजी देहावसान झाले. निधन समयी त्यांचे वय सुमारे 72 वर्षे इतके होते. अ‍ॅड. अजित कदम हे रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रतिष्ठीत व बुजुर्ग विधीज्ञ म्हणून सुपरिचीत होते. त्यांनी रत्नागिरी येथील विविध न्यायालयांमध्ये प्रदीर्घ काळ प्रॅक्टीस केली. ‘गोरगरीबांचे वकील’ म्हणून ते ओळखले जात असत. त्यांचे चिरंजीव हैद्राबाद येथे असतात. मागील काही काळापासून वृद्धापकाळामुळे त्यांना सांधेदुखीचा त्रास होता. त्यासाठी ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने हैद्राबाद येथे आपल्या चिरंजीवांकडे गेले होते. त्यांचे गुडघ्यावर दि. 31 जुलै 2026 रोजी ऑपरेशन करण्याचे ठरले. परंतु दुर्दैवाने एक दिवस अगोदर म्हणजे दि. 30 जुलै 2026 रोजी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला व शरीराची एक बाजू काहीशी असंवेदनशील झाली त्यामुळे त्यांचेवरील ऑपरेशन रद्द करावे लागले. त्यानंतर त्यांची प्रकृती नरमगरम अशी राहिली व उपचारांना साथ देईनाशी झाली. त्यांचे बुध. दि. 7 ऑक्टो. 2026 रोजी देहावसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांचे पार्थिव दुसर्‍या दिवशी गुरु. दि. 8 ऑक्टो. रोजी रत्नागिरी येथे आणण्यात आले व रत्नागिरी येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी रत्नागिरीतील अनेक वकील, सहकारी, आप्तेष्ट व स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव, सून असा परिवार असून रत्नागिरीतील तरुण पिढीतील नामवंत विधीज्ञ अ‍ॅड. मकरंद कदम हे त्यांचे पुतणे होत.

टाइम्स स्पेशल

त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच रत्नागिरी शहर व परिसरात तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे संपादक श्री. उल्हास घोसाळकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, त्यांनी सांगितले, ‘‘अ‍ॅड. अजित कदम व मी लॉ कॉलेजला एकत्र होतो. एक सच्चा व दिलदार मित्र म्हणून ते ओळखले जात असत. त्यांनी सदैव मैत्री जपली. त्यांच्या आत्म्याला चिर:शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना’’ अशा शब्दात त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg