साटेली भेडशी (प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक समता, बंधुता, करुणा आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई यांच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोडामार्ग येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महासंघाच्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुका शाखा आणि गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम वसंत मंगल कार्यालय, आंयी रोड, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात वंदनीय भन्ते सचित बोधी (अध्यक्ष, सम्यक संकल्प बहुउद्देशीय संस्था) यांची प्रमुख धम्मदेशना होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष आयु. व्ही. ए. कदम यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समाजकल्याण सभापती मा. रुहिता राजेश तांबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. महासंघाचे सल्लागार आयु. रमाकांत कृ. जाधव प्रमुख मार्गदर्शन करणार असून, दोडामार्ग तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. शंकर म. जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे. प्रतिमा पूजन, त्रिसरण, विधायक पंचशील, स्वागतगीत आणि प्रास्ताविकानंतर मान्यवरांची मनोगते होतील. त्यानंतर वंदनीय भन्ते सचित बोधी यांची धम्मदेशना होणार आहे. बुद्धांच्या समता, मैत्री, करुणा आणि प्रज्ञेच्या विचारांतून समाजाला प्रेरणा देण्याचा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. यावेळी महासंघाच्या माजी तालुका अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे. महासंघाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांच्यातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सन्मान, पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच बौद्धाचारी आणि श्रमणेर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय सामूहिक धम्मदीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. संदीप आनंद जाधव करणार असून, प्रास्ताविक आयु. अर्जुन कृष्णा आयनोडकर आणि आभार प्रदर्शन आयु. प्रकाश लक्ष्मण कांबळे करणार आहेत.
दुपारी २.३० ते ४ या दुसऱ्या सत्रात महिला विभागाच्या वतीने विशेष भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. धम्मविचार, सामाजिक प्रबोधन आणि आंबेडकरी चळवळीच्या प्रेरणादायी गीतांतून उपस्थितांना वैचारिक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होणार आहे. या सोहळ्यास सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग शाखांचे अध्यक्ष-पदाधिकारी, गोवा विभागाचे प्रतिनिधी, महिला विभागाच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बौद्धाचार्य, श्रमणेर, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. धम्म, समता आणि बंधुतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी समाजबांधवांनी कुटुंबीयांसह या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या संबंधित तालुका शाखा व गोवा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.