loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत असीम मुजावर व शान बिरवडकर विजेते

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर): नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड-पेठदेव यांच्या वतीने मंडळाचे माजी उपाध्यक्ष स्व. सतीश शंकर राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या लुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादात नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेत प्राथमिक गट (इयत्ता ४ थी ते ७ वी) मध्ये असीम मुजावर याने प्रथम क्रमांक, पार्थ बेल्हेकर याने द्वितीय क्रमांक तर आराध्या नाईक याने तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट मुलगी म्हणून चेतना घेवदे हिची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) मध्ये शान बिरवडकर याने प्रथम, हार्दिक कुरूप याने द्वितीय तर आबीद मुजावर याने तृतीय क्रमांक मिळविला. सर्वोत्कृष्ट मुलगी म्हणून कौसर वारुणकर हिने उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राची सुर्वे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम व नियोजन कौशल्याला चालना देणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांकडून नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचे कौतुक करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg