loader
Breaking News
Breaking News
Foto

बजरंग दल म्हसळा प्रखंडातर्फे वसुबारस उत्साहात साजरी; धावीर मंदिरात गोमातेचे पूजन, गोसेवा व गोसंवर्धनाचा दिला संदेश

म्हसळा (वार्ताहर) - हिंदू धर्मातील पवित्र सण वसुबारस बजरंग दल म्हसळा प्रखंडातर्फे उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धावीर मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात गोमातेचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना गोमातेचे धार्मिक तसेच भारतीय संस्कृतीतील महत्त्व सांगण्यात आले. गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा संदेश देत वसुबारसचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास बजरंग दल प्रखंड मंत्री प्रसन्न प्रकाश निजामपूरकर, सहमंत्री मयूर पाखड, संयोजक गणेश भुवड, सहसंयोजक प्रतीक जाधव, गोरक्षक रोहन म्हात्रे, समीर बनकर, अक्षय खेडेकर, अक्षय करडे, सुनील उमराटकर तसेच सरस्वती समितीच्या सेविका आणि बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोमातेच्या पूजनातून गोसेवा आणि गोसंवर्धनाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg