loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीत भाजपतर्फे ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान भरणार दिवाळी बाजार! महिला बचत गट आणि गृहउद्योगांना संधी

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावर्षीही ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. दिवाळी बाजार उपक्रमाचे हे सलग आठवे वर्ष असून, या दिवाळी बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या निमित्ताने स्थानिक महिला बचत गट, गृहउद्योग आणि लघुउद्योजकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कणकवली येथील समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी नगरसेविका प्रतिक्षा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, स्वप्नील राणे, संजय कामतेकर, महिला पदाधिकारी साक्षी वाळके, प्राची कर्पे, प्रियाली कोदे, आस्मा बागवान, बुथ अध्यक्ष नंदू वाळके, सखाराम राणे, अमोल रासम, मिथून ठाणेकर, उदय यादव, आनंद हुमरसकर इत्यादी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळी बाजारात सहभागी होणार्‍या स्टॉलधारकांसाठी भाजपाच्यावतीने मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टॉलधारकाला एक टेबल, दोन खुर्च्या आणि विजेची व्यवस्था करून दिली जाणार आहे. त्यामुळे महिला बचत गट, गृहउद्योग आणि स्थानिक उत्पादकांना स्टॉल शुल्काचा आर्थिक भार न घेता आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करता येणार असल्याचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी सांगितले. महिला बचत गटांसाठी २५ आणि कुंभार समाजासाठी १० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमात अधिकाधिक स्थानिक उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेविका मेघा गांगण यांनी केले.

टाइम्स स्पेशल

दिवाळी बाजारात स्टॉल लावू इच्छिणार्‍या महिला बचत गट, गृहउद्योग चालक आणि स्थानिक उत्पादकांनी नोंदणीसाठी शहराध्यक्ष अण्णा कोदे (९४२२३ ८१९००) व नगरसेविका मेघा गांगण (९१५२१२०५१२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक महिलांनी आणि उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मेघा गांगण यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg