loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जगबुडी नदीवर कपडे धुण्यास गेलेली ८० वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता; अपहरणाचा संशय

खेड - खेड शहरातील जगबुडी नदीच्या विसर्जन घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेली ८० वर्षीय लक्ष्मी गोविंद भोसले ही वृद्ध महिला बेपत्ता झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी त्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत त्या नदीवर असल्याची माहिती असून, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने भाचे मनोज मोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता वृद्ध महिलेचा शोध घेण्यासाठी खेड पोलीस तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg