loader
Breaking News
Breaking News
Foto

’रामायण’ चित्रपटात अमोल शेलार यांची भूमिका ’किएटिव्ह टेक्नॉलॉजी आर्टिस्ट’ म्हणून प्रभावी ठरली, रत्नागिरीच्या शिरपेचात मानााच तुरा

रत्नागिरी: शहरासाठी आणि संपूर्ण कोकणासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ’रामायण’ या चित्रपटात रत्नागिरीचा तरुण अमोल दत्तात्रय शेलार याने ’किएटिव्ह टेक्नॉलॉजी आर्टिस्ट’ आणि ’मोशन ग्राफिक्स आर्टिस्ट’ म्हणून अत्यंत महत्त्वाची तांत्रिक भूमिका पार पाडली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चित्रपटाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि उच्च दर्जाच्या तांत्रिक विभागात अमोलने आपल्या कलेची आणि अफाट कौशल्याची छाप पाडली आहे. नामांकित 'DNEG मोशन ग्राफिक्स (मुंबई)’ अंतर्गत काम करत असताना त्याने आपल्या कल्पकतेच्या जोरावर व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या चित्रपटाच्या क्रेडिट रोलमध्ये नाव झळकणे हे केवळ त्याच्या वैयक्तिक कष्टाचे फलित नसून, कोकणातील तरुण जागतिक पातळीवर कशा प्रकारे आपली चमक दाखवत आहेत, याचे उत्तम उदाहरण आहे.

लहानपणापासूनच कलेची आवड असलेल्या अमोलने या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी शहरातून आणि विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, प्रत्येक रत्नागिरीकरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण बनला आहे. अमोलच्या या यशाने इतर होतकरू तरुणांनाही स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg