खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्सव साजरा करत मनमुराद आनंद लुटला. सदरच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने व प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षिका राधिका घोडे, छाया भोजने, नम्रता मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व सांगितले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत मोरया मोरया, आली दिवाळी, दिन-दिन दिवाळी, ओवाळीते भाऊराया यांसारखी विविध दिवाळी सणावर आधारित गीते सादर करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष जाधव तसेच त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षक अमोल नरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘अमरासुर – अदृश्य विनाशाचा सम्राट’ हे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून ई-कचऱ्याची वाढती समस्या, पर्यावरणावरील दुष्परिणाम आणि मानवी आरोग्याला निर्माण होणारे धोके यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कंदील, विविध आकाराच्या पणत्या, कागदी रंगीबेरंगी चांदण्या, पताका तयार करून आपल्या वर्गाबरोबरच संपूर्ण शाळेचा परिसर सुशोभित केला. तसेच आपापल्या वर्गासमोर सुंदर अशा रांगोळ्या काढल्यामुळे दिवाळी सणाला एक वेगळाच साज चढला होता.
सर्वात आकर्षक बाब म्हणजे पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भव्य किल्ला रचून दिवाळी उत्सव साजरा केला. तद्नंतर विद्यार्थ्यांनी फराळ खाऊन दिवाळी सण साजरा केला. यावेळी उपप्राचार्य राहुल गाडबैल, शैलेश देवळेकर, तेजश्री कानडे, समन्वयक देवयानी महाजन, प्रितम वडके आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी दिवाळी सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.