loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे ग्रामपंचायत विभागातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

खेड - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेवर विश्वास ठेवून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य नेतृत्वावर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेश अध्यक्षतेखाली, भरणे ग्रामपंचायत विभागातील विविध पक्षातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह असंख्य महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा प्रवेश सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष साईराज पवार, भाजप कार्यकर्ते संतोष यादव यांच्या माध्यमातून रुपेश काते, भिकू शिगवण काका, चंद्रशेखर हेळगावकर यांच्यासह राजाराम लाड, उदय पांढरे, सुरज लाड, सुमित पाटील, अथर्व काते, रुपेश जाधव, राजू मांडवकर, नितीन डांगरे, अनिता शिगवण, हेमलता यादव, वैशाली काते, धनश्री काते, स्वरूपा खेडेकर, रिया महागावकर, शिवकन्या बांगर, सुमन शेले, योगिता बांगर, रामचंद्र डांगरे यांनी जाहीर प्रवेश केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा वाहतूक सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख वैजेश सागवेकर, प्रथमेश सुर्वे, अनिकेत पवार, विजय गुप्ता, मा. नगरसेवक संदेश भुवड, अविराज मोरे, प्रदीप भोसले, सर्वेश पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg