चिपळूण (संतोष पिलके) : भोईवाडी येथील समाजमंदिर सभागृहाचे उद्घाटन आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त भोई समाजाच्या वतीने आमदार शेखरजी निकम यांची लेझीम, बेंजो तसेच विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार शेखरजी निकम यांनी भोई समाजाने समाजमंदिराच्या माध्यमातून एकत्र येऊन सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजातील विविध विधायक कार्यांना चालना द्यावी, असे आवाहन केले. भोई समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या एकजुटीसाठी आपण केलेले योगदान उल्लेखनीय असून, समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देताना आमदार निकम म्हणाले की, समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनीही जागरूक राहून मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. समाजातील नव्या पिढीने शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजमंदिर सभागृहाच्या उभारणीसाठी समाजबांधवांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि एकत्रित प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तसेच या कामातील उर्वरित विकासकामेही येत्या काळात पूर्ण करण्यासाठी आपण आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार शेखरजी निकम यांनी आपल्या मनोगतातून दिली. यावेळी मीनल काणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे तसेच पांडुशेठ माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी समाजमंदिराच्या उभारणीमागील भूमिका, समाजबांधवांचे योगदान आणि या वास्तूमुळे समाजातील विविध कार्यक्रमांना मिळणारी हक्काची जागा याविषयी भावना व्यक्त केल्या. तसेच आमदार शेखर निकम यांनी समाजाच्या विकासासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्यामुळे भोईवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजमंदिर सभागृह हे समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक एकजुटीचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला नितीन ठसाळे, मीनल काणेकर, पांडुशेठ माळी, विलास वाजे, संजय जाधव, सुरज कदम, प्रभाकर सैतवडेकर, महेंद्र भुवड, उमेश सकपाळ, रिया गोंधळेकर, विजय दिवेकर, शांताराम जाधव, सुरेश जाधव, मदन जाधव, रमेश जाधव, भाऊ मिंडे, नितीन सैतवडेकर, संजय जुवळे, प्रदीप घाडगे, सुभाष जाधव, किसन जाधव, रोहित कदम , गोकुळ मिंडे, प्रमोद मिंडे, बबन मिंडे, ग्रामसेवक सूर्यवंशी, ग्रामसेवक गायकवाड, दीपाली जाधव, भोई समाजातील ज्येष्ठ मंडळी, महिला, युवक, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.