loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन दीपावलीच्या दिवशीच सावर्डेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण? अद्याप शोध नसल्याने जनतेतून संतापाची भावना

सावर्डे - ऐन दीपावलीच्या दिवशी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आठवी इयत्तेत शिकणार्‍या वय वर्ष १३, या अल्पवयीन मुलीला स्थानिक तरुणाने पळवून नेल्याचे जनतेने पोलिसांना सांगितले आहे. याबाबत संतापाचा उद्रेकही सावर्डे पोलिस स्थानक परिसरात दिसून आला होता. ऐन दिवाळीच्या दिवशीच अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल झाल्याने सावर्डे पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली होती. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. चार दिवस झाले तरी अजून सदर मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चार दिवसांनंतरही जर तपास लागत नसेल तर आमच्या भावनांचा उद्रेक होवू शकतो. त्यास पोलिस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा आज काही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चार दिवसानंतरही पोलिसांना मुलीचा सुगावा लागलेला नाही, असे जर असेल तर मगं व्हॉटस्अपवर चिथावणीखोर स्टेटस का टाकले जात आहेत? असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. या प्रकारामुळे सावर्डेत दोन समाजात तणाव वाढण्याची शक्यता असून त्यापूर्वीच सदर मुलीला पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली जात आहे. आज काही नागरिकांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेवून या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट केले आहे. आमदार निकम यांनी पोलिसांना याबाबत सूचनाही केल्याचे वृत्त आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात मोठा पोलिस फौजफाटा अद्याप तैनात आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण अजून मुलगी आणि तो तरुण पोलिसांना सापडला आहे की नाही. याची माहिती स्पष्ट होत नसल्याने जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. महिला पोलिसांच्या मार्फत मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असेल तर, तसे स्पष्टीकरण तत्काल देण्याची मागणी स्थानिक जनतेतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg