loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे येथे 'पाणी अडवा, पाणी जिरवा' अभियानांतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - अपुऱ्या झालेल्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा अभियाना अंतर्गत आज जानवळे येथे विविध ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. तळातील सार्वजनिक विहिरीजवळ ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पाणी आडवून भूगर्भातील पाणी पातळी वाढावी आणि भविष्यातील पाणी टंचाई टळावी, या उद्देशाने श्रमदानातून हे बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत जानवळे आणि ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्या एकजुटीने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg